दैनिक चालू वार्ता चिखलदरा तालुका प्रतिनिधी- प्रवीण मुंडे
मेलघाट चिखलदरा व्याघ्र प्रकल्प अंतर्गत जारीदा विभागा लगत असलेले दहेन्द्री गावात एक हरीण पाण्याच्या शोधात गावाकडे आले व विहिरीत पडलेले पाहूनगावकऱ्यांनी गावात माहिती दिली त्यात ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कासेकर यांनी वन विभागातील अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधून माहिती दिली .व सांगितले की हिरण जिवंत आहे .तात्काळ वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाले.विहिरीतून हिरण काढण्यास गावकऱ्यांनी खूप प्रयत्न केलेव हिरण काढून वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले .यात राजेंद्र कासदेकर सुखदेव साकोम पिंटू सुनील कासदेकरअसे अनेक गावकरी उपस्थित होते.व हिरनाला उपचारासाठी अचलपूर नेण्यात आले.