दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात पारडी -लोहा येथील सह्याद्री प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांने आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे .पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती मध्ये १७ व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ५ असे एकूण २२ विद्यार्थी पात्र झाले आहेत
सह्याद्री इंग्लिश स्कूल चे संस्थापक सुदर्शन शिंदे व सौ जयश्री शिंदे या दाम्पत्यानी गुणवता वाढी साठी विविध उपक्रम राबविले आहेत
या शाळेतील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ( वर्ग 5) १७ विद्यार्थी तर माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ( वर्ग 8 वीचे ) 5 विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील पात्र विद्यार्थी आरव चंद्रकांत वाडकर, श्रावणी संदीप सोनवळे, सह्याद्री सुदर्शन शिंदे, अर्णव गोविंद मोरे, वरद संजय कुमार जाधव, निर्जरा सोनाजी देशमाने, गुंजन विकास कोटलवार, शरयू हनुमंत हावरगे, सिद्धी सच्चिदानंद मल्लुरवार, वेदांत शिवकुमार मोरे, पंकज तिरुपती पवार, समर्थ सुभाष आंबेकर, पियुष सोपान तोरे, अनुष्का गजानन बेंद्रे, सोहम शशिकांत शेटे, गणेश माधव पोषट, केदार धोंडीबा भस्के या विद्यार्थी यश संपादन केले आहे
माध्यमिक स्कॉलरशिपसाठी ( 8 वी) सुमित शिवाजी राठोड, अनुष्का बालाजी वाघमारे, प्रार्थना दत्तात्रेय चौडेकर, शिवकुमार उमाकांत शेटे, शिवम माधव लोखंडे हे विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले आहेत.
शाळेचे संचालक सुदर्शन शिंदे, संचालिका जयश्री शिंदे सह्याद्री इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक नंदकिशोर मेकाले सह्याद्री इंग्लिश स्कूलचे वेवस्तापक साईकुमार दहिवाळ, सह्याद्री प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नागेश हिरास, उपमुख्याध्यापिका सुप्रिया वाडेवाले प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका रुक्मिणी धोंडगे , अमोल शिरसाट व शिक्षक वृंद यांनी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे