दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
१० मोटार सायकल केल्या
जप्त.
देगलूर:देगलूर शहरात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने . पुन्हा एकदा देगलूर पोलीस स्टेशनने दमदार कार्य करून पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी देगलूर सचिन सांगळे व पोलीस निरीक्षक देगलूर सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्रीकांत मोरे व गुन्हे शोध पथक यांना मार्गदर्शन करुन मोटार सायकल चोरांचा शोध लावणे या आदेशाचे देगलूर पोलीस स्टेशनचे दबंग पोउपनि श्रीकांत मोरे व त्यांची टिम यांनी मोटार सायकल चोरट्यांचा छडा लावण्याचा निर्धार करुन कशोशीने आरोपीतांचा शोध घेऊन मुखेड तालुक्यातील भगनुरवाडी जिल्हा नांदेड येथील रहिवासी माधव मारोती पांचाळ वय २८ वर्षे यास ताब्यात घेवून त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याचेकडून विविध गुन्हयातील खालील ०८ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. चोरी गेलेल्या गाड्यांचे नंबर व त्यांची किंमत पुढील प्रमाणे
पोलीस ठाणे देगलुर येते
११/२०२३ कलम ३७९ भा.द.वि. कंपनी स्पेलंडर प्लस किमत२०,००० रुपये
पोलीस ठाणे देगलुर
२३०/२०१९ कलम ३७९ भा.द.वि. कंपनी
पॅशन प्रो. किंमत३०,००० रुपये
पोलीस ठाणे नायगाव १२/२०२३ कलम ३७९ भा.द.वि. कंपनी स्पेलंडर प्लस किंमत४०,००० रुपये
पोलीस ठाणे नायगाव
१६६/२०२२ कलम ३७९ भा.द.वि. कंपनी
होन्डा साईन किंमत३०,००० रुपये
पोलीस ठाणे उमरी *४३/२०२३ कलम ३७९ भा.द.वि. कंपनी स्पेलंडर प्लस किंमत
२५,००० रुपये
पोलीस ठाणे धर्माबाद७१ / २०२३ कलम ३७९ भा.द.वि
पोलीस ठाणे धर्माबाद कंपनी
स्पेलंडर प्लस किंमत ३०,००० रुपये
पोलीस ठाणे लोहा
२५० / २०२२ कलम ३७९ भा.द.वि कंपनी स्पेलंडर प्लस
किंमत १०,००० रुपये
आरोपी उमेश बालाजी इंगळे वय २८ वर्ष रा. भगनुरवाडी ता. मुखेड यांचे कडुन विविध गुन्हयातील खालीलमोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या गाड्या पुढील प्रमाणे
पोलीस ठाणे देगलुर
४९९/२०२० कलम ३७९ भा.द.वि. कंपनी
पॅशन प्रो.किमत२०,००० रुपये
पोलीस ठाणे नायगाव
२१७/२०२१ कलम ३७९ भा.द.वि. कंपनी
स्पेलंडर प्रो.किमत२५,००० रुपये अशा एकुण १० मोटार सायकल त्यांची किंमत २,३०,००० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला व विविध पोलीस ठाणे हदीतील ०९ गुन्हे उघडकीस आणण्यात आले सदरची कामगीरी ही .पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी देगलूर सचिन सांगळे व पोलीस निरीक्षक देगलूर सोहन माछरे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि श्रीकांत मोरे, पो.हे.कॉ/२४३७ इंगोले, पो.ना / ५८० तलवारे, पो.ना/६२५ पत्रे, पो.कॉ/१७८८ मलदोडे, पो.कॉ./२७८ आडबे यांनी केली असुन यांच्या या उत्कृष्ट कार्य बद्दल देगलूर शहरातील नागरिकांकडून व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देगलूर पोलीस स्टेशनच्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.