दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे.
जालना /मंठा
भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारणी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली. त्यामध्ये मंठा तालुक्यातील नानसी गावचे सुपुत्र व आमदार बबनराव लोणीकर यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे सतीशराव निर्वळ यांची प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निर्वळ हे कुशल संघटक असून त्यांना पक्षीय कार्याचा दीर्घकालीन अनुभव आहे. आगामी काळामध्ये मंठा तालुक्यासह मराठवाड्यात पक्ष बळकट करण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.सतीशराव निर्वळ यांची प्रदेश कार्यकारणी सदस्पदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले