दैनिक चालु वार्ता उप संपादक जिल्हा उस्मानाबाद-नवनाथ यादव
भू म/ उस्मानाबाद :- “स्वराज्य” एक लहानसा शब्द पण आपल्या अपत्या प्रमाणे शिवाजी महाराजांनी व त्यांच्या साठी प्राण देणाऱ्या मावळ्यांनी हे स्वराज्य उभं केलं, आपल्या रक्तानं त्याचं सिंचन केलं.पण आणखीन एका मावळ्याने शिवाजी महाराजांचे प्राण स्वतः बलिदान देऊन वाचवले होते पण त्याचे नावही फार लोकांना माहीत नाही. तो वीर मावळा म्हणजे “शिवा काशीद”.स्वराज्याचे शिलेदार नाभिकरत्न “नरवीर शिवाजी काशिद” ५ मे १६३० यांच्या ३९३ वी जयंती शहरातील श्री संत सेना महाराज सांस्कृतिक सभागृह कसबा येथे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी स्वराज्याचे शिलेदार शिवरत्न शिवा काशीद यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित राहून प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन केले.यावेळी पं.स.उप सभापती रामकीसन गव्हाणे,मा.नगरसेवक किरण जाधव, कृ.उ.बा.समिती संचालक दत्तात्रय गायकवाड, विकास यादव ,दादासाहेब राऊत,संजय चौधरी ,अश्रू चौधरी,संभाजी चौधरी,प्रदीप चौधरी,राकेश चौधरी,सुनील चौधरी, उपसंपादक उस्मानाबाद नवनाथ यादव, प्रकाश चौधरी,बाळासाहेब चौधरी, नितीन चौधरी,अमोल शिंदे, मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.