दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड/कलंबर:- नांदेड ते कंधार रस्त्यावर भोपाळवाडी येथील रस्ता बनला धोकादायक छत्रपती संभाजी महाराज चौक ते मारोतीराव पाटील घोरबांड यांच्या मळ्यापर्यत सर्व रस्ता चिखलमय खडेमय झाला आहे. प्रवाशांना पायी सुध्दा चालता येत नाही. मोटार सायकल स्वार गाडी सिलीप होऊन अपघात होत आहेत. अनेक जणांना हात, पाय जिवाशी मुकावे लागत आहे.गुत्तेदार गुत्ते सोडून गेला असून रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. प्रशासनाने या रस्त्याकडे लक्ष देऊन दुसऱ्या गुत्तेदाराना गुत्ते देऊन रस्ता दुरूस्त करण्याची मागणी कलंबर खुर्द, भोपाळवाडी, कलंबर बु., संगुचीवाडी, छत्रपती संभाजी महाराज चौक भोपाळवाडी फाटा येथील व्यापारी व नागरिकांनी रस्ता दुरूस्त करण्याची गरज आहे पण लोकप्रतिनिधी याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यांनी सुद्धा रस्ता दुरूस्त करण्यासाठी प्रशासनाला कळवून रस्ता लवकरात लवकर तयार करून देण्यात यावा अशी मागणी केली आहे.