दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर (प्रतिनिधी) – आज परमपूजनीय गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालय, देगलूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ साजरा करण्यात आला. याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर,शालेय समितीच्या अध्यक्षा शिल्पाताई अटकळीकर, वक्त्या रुपा पांचारे मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम शाहू महाराज व प.पू.गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी माहिती मुलांना करून दिली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्ष प्रित्यर्थ आज दि. 6 मे 2023 रोजी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थी व पालकांना शैक्षणिक वर्ष 2022 -23 चा निकाल व प्रगती पत्रक वाटप करण्यात आले तसेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती, बी. टी.एस. निकाल तसेच संस्कृती ज्ञान परीक्षेस निकाल. राष्ट्राचे चेतना शिबिराचे प्रमाणपत्र सचिन जाधव यांनी जाहीर केले .मंचावरील मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक व पुढील वर्षासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आले .यानंतर अध्यक्ष समारोपात देगावकर यांनी बहुजनाचे कैवारी शाहू महाराज यांची महती मुलांना पटवून सांगितले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भानुदास शेळके यांनी केले.