दैनिक चालु वार्ता -संपर्क प्रमुख- भरत पाटील पवार
लोहा- आज लोहा कंधार तालुक्यात घराणेशाही चरण शिखरावर असून परिवारातील सदस्यांना मोठ करण्यासाठी राजकीय आजी माजी नेत्यांचे प्रयत्न चालू असून आर्थिक ताकतीच्या जोरावर सत्ता मिळवणे आणि त्यातून पैसा कमविणे आणि मिळालेल्या पैस्यातून पुन्हा सत्ता मिळवणे हा गुप्त हेतू स्वीकारून लोहा कंधार तालुक्यातील नेत्याचे राजकारण चालू आहे.यात शेतकऱ्यांचे पिक विम्याचा व अनुदानाचा,बेरोजगार युवकांच्या रोजगाराचा,विध्यार्थ्यांचा शिक्षणाचा,महिलांचा हक्कांचे मुद्दे कुठेच नाही फक्त महापुरुष्यांच्या नावाने, एकमेकावर वयक्तिक घाणेरडे आरोप करून भोळ्या भाभड्या जनतेला मूर्ख बनवण्याचे काम लोहा कंधार तालुक्यातील नेत्यांचे चालू आहे.शेवटी आपली टाकत दाखवण्यासाठी कार्यकर्ते आणि युवकांना निवडणुकीच्या काळात दारू मुबलक प्रमाणात वाटप करून वेसन लाऊन गोड बोलून त्यांचे घरे उठवण्याचे काम लोहा कंधार येथील नेत्यांचे झाले आहे.शिवाय मीच मतदारांना जास्त रक्कम वाटून निवडून येईल असे खाजगीत बोलायचे.असे आपल्या नेत्यांचे चालले आहे.मी तालुक्यातील जनतेला आव्हान करू इच्छुतो कि येणाऱ्या काळात आपण लोहा कंधार तालुक्यात होणाऱ्या बेकायदेशीर प्रकार निवडणूक आयोगाच्या लक्ष्यात आणून देऊ.मी या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी फक्त आणि फक्त जनतेच्या विकासाठी येणारी विधानसभा निवडणूक लढवणार,फक्त तुमच्या सहकार्याची गरज आहे.