दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- जगाला शांततेचा देणारे महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त पोखरभोसी ता.लोहा येथे गावातील प्रमुख मार्गावरून धम्मज्योत मिरवणुक काढून मोठ्या उत्साहात व हर्षउल्लासात बुद्ध पौर्णिमि साजरी करण्यात आली . मौजे पोखरभोसी येथे सायंकाळी बुद्ध विहार या ठिकाणी जयंती मंडळाचे अध्यक्ष एकनाथ कांबळे, उपाध्यक्ष प्रकाश वाघमारे,सचिव गोविंद भावे, पोलीस पाटील दयानंद कांबळे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध , परमपूज्य महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुजन करुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीची मिरवणुक व धम्मज्योत मिरवणुक गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोशात शांततेत मिरवणुक काढण्यात आली .यावेळी मोठ्या प्रमाणात महिला ,पुरुष व बालक यांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून हातात पणती ज्योत घेऊन मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता .मिरवणुक विसर्जन झाल्यानंतर बौद्ध उपासक गोविंद भावे व बौद्ध उपासक, उपासिका यांच्याकडून सामुदायिक वंदना ( त्रिशरण पंचशील)घेण्यात आली.यानंतर उपस्थितीतांना खिरदान व अन्न दान वाटप करण्यात आले यावेळी नागोराव गजभारे,रत्नाकर कांबळे ,दिलीप कांबळे,गणेश कांबळे ,गंगाधर कांबळे,मनोहर कांबळे,राहुल कांबळे,पंकज वाघमारे, उत्तम कांबळे, संभाजी कांबळे, गणेश वाघमारे यांच्यासह बौद्ध वाड्यातील बौद्ध उपासक – उपासिका व बालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.