दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी –
परभणी (जि. प्र.) साप्ताहिक हर्ष नगरीचे संपादक तथा परभणी महानगर मराठी पत्रकार संघाचे महानगर सचिव संघपाल अढागळे यांच्या वाढदिवसानिमित्त फळे व बिस्किटे वाटप करुन हा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
शहरातील सामाजिक संस्था, समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे पदाधिकारी, त्यांचे नातेवाईक तथा मार्गदर्शक आदींचे वाढदिवस अन्य कोणताही वायफळ खर्च न करता समाजोपयोगी तथा सामाजिक उपक्रम राबवूनच साजरे करण्यात येतात. त्याच अनुषंगाने आज गुरुवार, दिनांक, ४ मे २०२३ रोजी ह्या वाढदिवसानिमित्त परभणी शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रांगणात रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक आदींना केळी, चिकू व बिस्किट पुड्यांचे वाटप करून समाजहित अभियान प्रतिष्ठान, परभणी जिल्हा व महानगर मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा वाढदिवस साजरा करुन उपस्थित मान्यवरांनी संघपाल अढागळे यांना भरभरुन शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार हट्टेकर, परभणी महानगर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय कराळे, कार्याध्यक्ष शिवशंकर सोनूने आदींच्या प्रमुख उपस्थितीत फळे वाटप करण्यात आली, त्यावेळी सरचिटणीस पांडूरंग अंभुरे, समाजहित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे, प्रसिध्दी प्रमुख शेख अझहर, विद्रोही कवी प्रा.यशवंत मकरंद, दिग्दर्शक सुनील ढवळे, भीमा- कोरेगाव मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप वायवळ, रयत मदत केंद्राचे बबन आण्णा मुळे, मनोज अंबटी, शंकर बनसोडे, विनोद वाडेकर, बंटी गायकवाड, दीपक पंचांगे, राजू घोगरे, राहूल पंचांगे, विष्णू कोरडे, रामसिंग अंभोरे व समाजहित अभियान प्रतिष्ठान, माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ, सर्वधर्मीय फुले- शाहू-आंबेडकर जयंती उत्सव समिती, परभणी जिल्हा व महानगर मराठी पत्रकार संघ आदी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसाच्या औचित्यावर रुग्ण व नातेवाईकांना फळे वाटप करुन दिलासा देण्याचे हे मानवीय सहानुभूतीचे कार्य पार पाडल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले गेले.