दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
अगोदर आहे त्याच सरकारी दवाखान्याला उतरती कळा लागली असतानी केवळ स्वतःच्या मार्केटिंग साठी शिंदे फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा करून महाराष्ट्रभर सुरू केलेल्या हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याला आज गंगापूर येथे भेट दिली.एका जुन्या आणि जीर्ण झालेल्या पंचायत समिती कर्मचारी वसाहतीमध्ये हा दवाखाना महाराष्ट्र दिन सुरू करण्यात आला आहे अतिशय जीर्ण झालेल्या या इमारतीच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य आणि डुकरांचा तसेच मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार सुरू असतो. बाळासाहेबांचे नाव तुम्हाला मोठे करता आले नाही तरी चालेल मात्र या शतकातील सर्वात मोठ्या लोकप्रिय आणि हजारो नेते,आमदार,खासदार मंत्री घडविणाऱ्या या महान नेत्याच्या नावाचा आवमान होईल असे काही उद्योग तरी करू नका.