दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर तालुक्यातील शेवटचा टोक असलेल्या कुडली हानेगाव
हा रस्ता सध्या अतिशय बिकट झालेला त आहे या रस्त्यावरून वाहनांना येजा करण्यासाठी अतिशय त्रास होत आहे कुडली गावातील लोकांना व शालेय विद्यार्थ्यांना हाणेगाव येथे त बाजारपेठ मोठी असल्यामुळे व तसेच देगलूरला येण्या जाण्यासाठी या रस्त्यावरून ये जा करावे लागते हा रस्ता अतिशय बिकट झालेला आहे पूर्ण रस्त्यावरची दगड बाहेर निघत आहेत तरी सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे झोपेचे सोंग हा घेत आहे दुचाकी चार चाकी वाहनांना अतिशय त्रास होत आहे अपघात होण्याची फार मोठीशक्यता आहे एकीकडे नागरिकांना विकासाचा आश्वासन देत असतात मात्र अजूनही कुडली गाव विकासापासून कोसो दूर आहे
प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करत आहे तात्काळ हा रस्ता तयार करून द्यावे अशी मागणी कुडली गावच्या जनतेची आहे.