दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक-ओंकार लव्हेकर
कंधार —
शिवा अखिल भारतीय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे यांच्या हस्ते डी.एन.मंगनाळे यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या वतीने नुकताच जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी संभाजी पाटील बुढढे जिल्हाध्यक्ष शिवा संघटना, जी.एस. मंगनाळे राज्य उपाध्यक्ष, बाबुराव फसमले जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ, बालाप्रसाद मानसपुरे कंधार तालुका अध्यक्ष शिवा संघटना, नामदेव कल्याणकस्तुरे, बालाजी भुरे जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना आदींच्या प्रमुख उपस्थिती होती.
डी एन मंगनाळे हे जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा फुलवळ अंतर्गत सोमासवाडी येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. २९वर्ष सेवा काळातील शैक्षणिक कार्याची दखल घेऊन पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.