दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/नांदेड:- दिनांक 7/5/2023 ला , नांदेड़ च्या टायगर ऑटोरिक्षा संघटनेच्या पाचव्या वर्धापन दिनी, संघटनेच्या कार्यालयांचा उदघाटन सोहळा संपन्न झाला .कार्यक्रमाचे उदघाटक अध्यक्ष , ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचे सरचिटणीस आणि विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशन चे अध्यक्ष तसेच टायगर ऑटोरिक्षा संघटना चे मार्गदर्शक मा. विलास भालेकर जी , सोबतच नांदेड शहराचे अप्पर पोलिस अधीक्षक मा. अविनाश कुमार यांच्या हस्ते फीता कापून कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले . याप्रसंगी मा. संजय ननवरे ( वाहातुक पोलिस निरीक्षक – वजिराबाद ), मा. ज्ञानेश्वर देवकते ( पोलीस निरीक्षक – इतवारा )., मा.विजय जाधव ( पोलिस निरीक्षक – विमानतळ ) होते . ईद मिलन, वर्धापन दिन आणि कार्यालयाचे उदघाटन अश्या द्विगुणी महोत्सवा प्रसंगी मा. भालेकर जी सोबत नागपूर वरून विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशन चे महासचिव मा. राजू इंगळे , नागपुरातील टायगर ऑटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष मा. जावेद शेख , महासचिव प्रकाश साखरे , संघटक सय्यद रिजवान , सहसचिव किशोर इलमकर आजच्या शुभेच्छा प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते .
टायगर ऑटोरिक्षा संघटना नांदेड चे अध्यक्ष मा. अहमद (बाबा) बागवाले यांच्या कार्यालयीन उदघाटन सोहळ्या समारंभाला , धम्मपाल थोरात , शेख अहसान, मुकिद पठाण शेख बबलू,मोहम्मद साबेर,शेख अहेमद, संदिप वने,मुस्तकिम (उफ गुडु) ,शेख खदीर ,उतम खदारे,संजय शेळके, गंगा सरोदे, अंड शेख अजीस ,शेख खलील, व अनेक टायगर ऑटोरिक्षा संघटनेच्या पदाधिकारी आणि सभासदांनी उत्साहाने सहभागी झाले.