
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधी -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा.. लोकनेते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त युवाशक्ती करिअर मेळावा पार पाडला यावेळी मंठा येथील हजारो युवकांनी यात सहभाग नोंदविला.मंगल प्रभात लोढा मंत्री, विकास, रोजगार, उद्योजगता विभाग व नाविन्यता विभाग यांच्या संकल्प मेनून राज्यभर विद्यार्थ्यासाठी शिक्षण व रोजगाराच्या संधी बाबत समूपदेशन मेळाव्याचे आयोजन प्रौद्योगिक प्रशिक्षण संस्था परतुर ,मंठा, जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने इंदीरा मंगल कार्यालय परतुर् येथे होते दि. 08 रोजी करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उदघाटन माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर साहेब यांच्या हस्ते संपन्न झालो.
या वेळी व्यासपिठावर आय.टी.आय कॉलेज मंठा चे प्राचार्य राजेश धानोरकर , यांच्यासह मंठा येथील औ. प्र. संस्थेचे कर्मचारि उपस्थितीत होते
यावेळी मार्गदर्शक सुमिल उदयगिरीसह ४८ संचालकांचे मार्गदर्शन उपस्थितीत विद्याथ्यांना लाभले यावेळी हजारोच्या संख्येने विद्यार्थी उपस्थितीत होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लक्ष्मीकांत कुलकर्णी, शिष्य निर्देशक, रमाकांत कांबळे शिल्प निर्देशक बोनी यांनी अथक परिश्रम घेतले.