
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड/केज– संजय गांधी आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजने अंतर्गत अर्ज दाखल केलेल्या पात्र अर्जदारांना अनुदान मंजूर होण्यासाठी बैठकीची आवश्यकता असून संजय गांधी विभागाच्या नायब तहसीलदार आशा वाघ गायकवाड यांनी दाखल झालेल्या अर्जा पैकी ४६८० अर्जाची छाननी पूर्ण केली आहे.
याबाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील विधवा, परित्यक्ता, दिव्यांग, निराधार आणि वृद्द यांनी संजय गांधी निराधार योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजने अंतर्गत आर्थिक अनुदान मिळण्यासाठी अर्ज सादर केलेले आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे ४३०० आणि संजय गांधी निराधार योजनेचे ३८० असे एकूण ४६८० अर्जाची छाननी ही संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार आशा वाघ – गायकवाड आणि त्यांचे कर्मचारी श्रीमती ओव्हाळ व अव्वल कारकून टोळमारे व यांनी पूर्ण केली आहे. दरम्यान तहसीलदार तथा समितीचे सचिव दुलाजी मेंडके हेअर्ज मंजुरी संबंधी समितीची बैठक आयोजित करत होते; परंतु दि. ८ मे रोजी तहसीलदार मेंडके त्यांची औरंगाबाद येथे अन्न धान्य वितरण अधिकार या पदावर बदली झाली असल्याने नियोजित बैठक होवू शकणार नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आता पात्र अर्जदार आणि लाभार्थी हे बैठक कधी होईल? अशी चर्चा करीत असून वृद्ध व निराधार अर्जदार हे तहसील कार्यालयाकडे आशेने हेलपाटे मारत आहेत