
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड/आष्टी –आष्टी तालुक्यातील २०१७ ते २०२२ पर्यंत १२५ ग्रामपयतने तालुक्यातील सर्व कामाच्या जी एस टी भरण्याची चौकशी करून जी एस टी शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे न भरणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी दि. ३ मे रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे केलेली होती. सदर पत्रावर गटविकास अधिकारी यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती परंतु गेल्या एक वर्षापासून १२५ ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांनी त्रिसदस्यीय समितीला कसलाही प्रतिसाद न दिल्याने तसेच ज्या कंत्राटदारांच्या नावे ही कामे आहेत त्या कंत्रादारवर सुद्धा कारवाई ची मागणी केली होती परंतु ग्रामसेवकांनी त्रिसदस्यीय समितीला कसलाही प्रतिसाद न दिल्याने शेवटी गटविकास अधिकारी यांनी ०७ दिवसात खुलासा सादर न केल्यास दि. ११ मे रोजी प्रशासकीय कारवाई करून वेतनवाढ थांबविण्यात येईल अशी नोटीसा १२५ ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना मनसेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांच्या तक्रारीवरील कारवाईने आष्टी तालुक्यात खळबळ.