
दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी- शिवकुमार बिरादार
मुखेड दि. १२ मे
रोजी उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे जागतिक नर्सेस दिवस साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय नर्स दिन. रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 12 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय ‘जागतिक परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. 1971 मध्ये आंतराष्ट्रीय परिचारिका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. फ्लोरेन्स नायटिन्गेल यांनी आधुनिक नर्सिंगचा पाया रचला. त्यांच्याच स्मरणार्थ हा दिन साजरा केला जातो.
या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली, व वैद्यकीय अधिकारी डॉ सुधाकर तहाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व, डॉ उमाकांत गायकवाड सर, डॉ शोभा देवकते मॅडम, डॉ संतोष टाकसाळे सर, डॉ इंगळे सर, डॉ रश्मी संगनोर, डॉ म्याकलवार, पत्रकार, विठ्ठल पाटील, शिवकुमार बिरादार, मेट्रोन श्रीमती मालती वाघमारे, परिसेविका श्रीमती लता पांचाळ, श्रीमती तारामती केंद्रे, श्रीमती बिजला फत्तेलष्कर, श्रीमती पदमा पांचाळ, श्रीमती संगीता यमलवाड, श्रीमती राधा गिनेवाड, स्वाती जोशी, चंदा सुर्यवंशी, विद्या मुंडकर, धम्मशिला मोडक, सोनाली सोनवणे, ऐश्वर्या जमादार, शोभा बर्गे, संजय वळवी, योगेश पावरा, पुंडाजी सगर, सविता वासमवाड, लखन पवार, प्रशांत बनसोडे उपस्थित होते.