दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खा. संजय राऊत हे लोहा व कंधार दौऱ्यावर येणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे यांनी दिली.
राज्यातील शिवसेनेचे महत्वपूर्ण नेते जेष्ठ पत्रकार दैनिक सामनाचे संपादक खा. संजय राऊत हे दि.१९ मे लोहा -कंधारच्या दौऱ्यावर येत असून लोहा सकाळी ९.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवसेनेच्या सिंहगड जनसंपर्क कार्यालयात येणार असुन येथे त्यांचा शिवसेनेच्या वतीने जंगी सत्कार करण्यात येणार आहे तसेच येथे खा.संजय राऊत हे पत्रकारांशी संवाद ही साधणार अशी माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे यांनी दिली.