
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी -श्री, रमेश राठोड
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
आर्णी तालुक्यातील येत असलेल्या सावळी सदोबा परिसरातील सुभाष नगर येथील एका शेतातील विहिरीत पडून दोन गायीचा मुत्यु झाला,तर एक गाय बचावली पण त्या गायींचे आर्धिक प्रस्तुत डगंमगिवर हि घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली,पशुपालकांचे नुकसान झाले आहे, विठ्ठल नथ्थु जाधव, आणि सुनिल रामजी राठोड, यांच्या मालकीच्या तिन गायी गुरुवारी नेहमी प्रमाणे शिवारात चरायला गेल्या होत्या तिन्ही गायी सायंकाळी घरी परतल्या नाहीत त्यामुळे पशुपालकांनी परिसरातील शेतशिवारामध्ये त्यांचा शोध सुरू केला, तिन्ही गायी एका शेतातील विहिरींमध्ये पडुन असलेल्या अवस्थेत आढळून आल्या, गावातील नागरिकांच्या सहकार्याने तिन्ही गायींना विहिरीबाहेर काढण्यात आले त्यापैकी दोन गायी मूत झाल्या होत्या, एक गाय जिवंत होती लगेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून तिच्यावर उपचार करण्यात आले, त्यामुळे एक गाय बचावली,
———————————–
सुभाषनगरची घटना:-पशुपालकांचे नुकसान पाणी समस्या कायम,
या घटनेमुळे पशुपालकांचे आर्थिक नुकसान झाले आहे त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून पशुंचे पालन केले होते अनेक संकटांना तोंड देऊन पाळीव पशुंची देखभाल केली मात्र उन्हामुळे कासावीस झालेल्या दोन गायीचां पाण्याच्या शोधात मूत्यु झाला,उन्हांची दाहकता वाढत असल्यांने नागरिकांसह प्राण्यांनाही पाणी समस्येचां सामना करावा लागत आहे,
———————————–