
दै. चालू वार्ता
प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
जानापुरी:- येथे शहीद संभाजी कदम यांची पुण्यतिथी शहीद दिन मण्हुन साजरा करण्यात आला जानापुरी येथील सुपुत्र शहीद संभाजी कदम हे 29/11/2016 रोजी जम्मू काश्मीर येथील नागररोटा येथे आपले कर्तव्य दर्शवित असताना अतिरेकी हल्ल्यात ते शहीद झाले होते, आज त्यांची 5 वी पुण्यतिथी आहे तो दिवस शहीद दिवस साजरा करण्यात आला, सकाळी 7 वाजता त्यांचे बंधू पांडुरंग माउली जानापुरीकर यांनी त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला महाअभिषेक केला, नंतर जि.प.प्रा. शाळा जानापुरी येथील मुख्याध्यापक नरवाडे सर व शालेय शिक्षण समिती चे अध्यक्ष कैलास पाटील कदम, कस्तुरे सर, सय्यद सर, देबडवार सर, वांगीकर सर, कळकेकर मॅडम, साळवे मॅडम यांनी शाळेत आदरांजली वाहिली व नंतर लोहा कृ . ऊ. बाजार समितीचे उपसभापती बळी पाटील कदम, सरपंच दादाराव गच्चे, उमेश कदम, कपील पांचाळ, विरपत्नी शितल संभाजी कदम, विरकन्या तेजस्विनी कदम, सुनिता सुर्यवंशी यांनी संभाजी कदम यांच्या पुतळ्याला अभिवादन केले