दैनिक चालु वार्ता उप संपादक धाराशिव-नवनाथ यादव
धाराशिव:-जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती उत्सव मोठया दिमाखात दि.31 मे रोजी श्रीक्षेत्र चौंडी येथे शासकीय पातळीवर होत असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागरी विमान वाहतुक केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया,महाराष्ट्राचे महसुल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री राम शिंदे तर विशेष अतिथी म्हणून श्रीमंत राजे यशवंतराव होळकर (तृतीय), होळकर संस्थान, इंदौर, उपस्थित राहणार आहेत तसेच या जयंती उत्सव सोहळ्यासाठी खा. सुजय विखे, शिर्डीचे खा.सदाशिव लोखंडे आ.बाळासाहेब थोरात,आ.सत्यजित तांबे,आ.निलेश लंके,आ.आशुतोष काळे, माजीमंत्री आण्णासाहेब डांगे,आ.संग्राम जगताप,आ.शंकरराव गडाख,आ.बबनराव पाचपुते आ.श्रीमती मोनिकाताई राजळे, आ. गोपीचंद पडळकर,आ.प्राजक्त तनपुरे, आ.डॉ.किरण लहामटे,आ.रोहित पवार,आ.शिवाजीराव कहिले आ. दत्तात्रय भरणे,आ.अनिल गोटे,आ.रमेश शेंडगे, आ. नानाभाऊ कोकरे,आ.विजयराव मोरे,माजी मंत्री महादेव जानकर,आ.नारायण पाटील,आ.रामराव वडकुते,आ.हरिभाऊ भदे आ.लहू कानडे,विकास महात्मे,आ.प्रकाश शेंडगे आजी-माजी विधानसभा सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रणजीत हापटे यांनी केले आहे.