दैनिक चालु वार्ता सांगोला प्रतिनिधी -प्रभाकर कांबळे
शैक्षणिक वर्ष २०२२_२३ मधील इ.बारावीच्या विद्यार्थ्यांचा बोर्ड परीक्षेचा निकाल दि.२५ मे रोजी जाहीर करण्यात आला असून, यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या श्री.शिवाजी विद्यालय व ज्यु काॅलेज महूद बु ता.सांगोला जि.सोलापूर या शाखेचा निकाल 99.32% लागला. यामध्ये विज्ञान शाखेचे एकूण 101विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यामध्ये 38 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 62 द्वितीय श्रेणी व 1पास श्रेणीत उत्तीर्ण होऊन विज्ञान विभागाचा निकाल – 100% लागला तर कला शाखेचे एकूण 74विद्यार्थी परिक्षेला बसले होते त्यामध्ये 6विद्यार्थी विशेष प्राविण्य,40 प्रथम श्रेणी,27 द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण होऊन कला शाखेचा निकाल 98.64% लागला. विज्ञान विभाग प्राविण्य प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक -कु. अर्जुन स्नेहल शिवाजी 72.67%
द्वितीय क्रमांक -कु. भोसले आदिती विकास 71.50%
तृतीय क्रमांक -कु.बेंदगुडे शुभांगी बाळासाहेब 71.33%
कला विभाग प्राविण्य प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक -कु. बोडरे माधुरी बाबासो 81.50%
द्वितीय क्रमांक- कु. भोसले दिक्षा सुनिल 77.17%
तृतीय क्रमांक- कु. येडगे प्रियंका शक्ती 76.50%
यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा.युवराज बळवंत, प्रा.नानासाहेब वाघमोडे, प्रा.हारूण पठाण, प्रा.नानासाहेब निकम, प्रा.शरद कारंडे, प्रा.अभिमान गाढवे, प्रा.रमेश ढाळे, प्रा.अजित खिलारे, प्रा.दिपाली गेजगे,प्रा. जयश्री चौगुले व प्रा.सीमा कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष, सदस्य,ग्रामस्थ,पत्रकार, शिक्षण प्रेमी, माजी विद्यार्थी ,विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री. रेडे साहेब, प्राचार्य मा. श्री.कोरे साहेब, पर्यवेक्षक श्री.रायभान साहेब, यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले.
रयत शिक्षण संस्थेचे श्री शिवाजी विद्यालय महुद चे घवघवीत यश संपादन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन या यशामध्ये मार्गदर्शन लाभलेल्या सर्व विद्यालयाचे शिक्षक व शिक्षिका यांचे मनःपूर्वक आभार तसेच येथून पुढच्या काळात विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी समस्त ग्रामस्थ शिक्षणप्रेमी स्थानिक सल्लागार समिती यांचे असेच सहकार्य मिळावे:प्राचार्य मा. श्री कोरे सर