दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
चंद्रपूर
चंद्रपूर :- जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचे मोठे व जिल्हा मुख्यालयापासून अतिशय अंतरावर असलेल्या ब्रम्हपुरी ला जिल्हा घोषित करण्यात यावे यासाठी ब्रम्हपुरीकर 1982 या वर्षांपासून मागणी करीत आहेत. मात्र राज्य शासनाने सदर मागणीकडे सातत्याने मग ते सरकार कुणाचेही असो कानाडोळा केल्याने शासनाला जाग आणण्याकरीता ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण कृती समीतीच्या वतीने पुनःश्च मशाल पेटवल्या गेली असुन दि. 2 जुन रोजी आयोजित आंदोलनास व त्यापुढे होणाऱ्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचा व ही मागणी रेटून धरण्याचा निर्णय आम आदमी पक्ष ब्रम्हपुरी विधानसभेच्या वतीने घेण्यात आला आहे.
याबाबत आम आदमी पार्टी ब्रम्हपुरी विधानसभेच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एकमताने जिल्हा निर्मीतीच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे व सदर पाठींबा पत्र 29/05/2023 ला ब्रह्मपुरी जिल्हा संघर्ष समिती ला देण्यात आले.
ब्रम्हपूरी हे ठिकाण चंद्रपूर जिल्हा मुख्यालयापासुन सुमारे 125 किमी अंतरावर असुन नागरिकांना जिल्हा मुख्यालयी विविध शासकीय कामांसाठी, जिल्हा न्यायालय अंतर्गत वाद, शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी सतत होणाऱ्या पायपीटीमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासातुन प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागतो. तर वारंवार प्रवासामुळे जनसामान्य नागरिकांना आर्थिक फटका सुध्दा सहन करावा लागतो. नागरिकांची सतत होणारी परवड थांबविण्यासाठी ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीने आपल्या वारंवार रास्त मागणीतुन शासनस्तरावर सलग पाठपुरावा करीत ब्रहपुरी जिल्हा निर्मीतीसाठी आग्रही मागणी धरली आहे. मात्र विद्यमान शिंदे-फडणवीसच्या तसेच त्यापूर्वी असलेल्या काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकाने ब्रम्हपुरी करांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. केवळ “आम्ही निवडून आल्यास किंवा सत्तेत आल्यास जिल्हा बनविल्याशिवाय राहणार नाही आणि जिल्हा झाला नाही तर मतं मागणार नाही” अश्या बतावण्या इथल्या लोकप्रतिनिधींकडून सातत्याने होत आल्या, पण सरकारकडुन अद्यापही कुठलीच हालचाल न झाल्याने ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण कृती समितीने रास्त मागणीकडे कानाडोळा करणाऱ्या राज्यशासनाला जाग आणण्या हेतु पुनच्छ एकदा ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण समीतीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असून ही मागणी रेटून धरण्यात येणार आहे.
यासंदर्भात ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती.
सदर बैठकीला विधानसभा प्रमुख नावेद खान, युवा विधानसभा अध्यक्ष राहुल सोनटक्के, जावेद खान, ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष दिलीप प्रधान व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.