दैनिक चालु वार्ता उपसंपादक धाराशिव -नवनाथ यादव
आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी,भूम तालुक्यातील विविध संघटना आंदोलनासाठी रस्त्यावर
भू म:- तालुक्यातील अरसोली येथील आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या कठोर शासन व्हावे.तसेच यवतमाळ जिल्ह्यातील मातंग समाजाच्या मुलीवर केज तालुक्यात आणून बलात्कार करून खून करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी. या घटनेच्या निषेधार्थ गोलाई चौक येथे दि ३० रोजी मंगळावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.भूम तालुक्यातील आरसोली येथे बौद्ध समाजाची निर्भया वय 8 वर्षे 1 महिना या मुलीला आंब्याचा पाड खायला देतो असे सांगून शेतात घेऊन जाऊन गावातीलच राहणारा नराधम पंडित धोंडीराम गोयकर याने मुलीसोबत दुष्कर्म केलेले आहे. या घटनेचा गुन्हा दाखल असून आरोपी अटक आहे. आरोपी हा सावकार असल्यामुळे तो या घटनेला दाबण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.तरी या घटनेचा निपक्षपाती पणे मेडिकल रिपोर्ट, व चार शीट दाखल करण्यात यावा. दुसरी घटना ही यवतमाळ जिल्ह्यातील मातंग समाजाच्या मुलीवर केज तालुक्यात आणून तिच्यावर बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा झाली पाहिजे.पीडित मुलीला न्याय मिळण्यासाठी आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी भूम येथे गोलाई चौकात मोठ्या संख्येने बहुजन समाज बांधव जमा झाल्याचे दिसून आले. या रस्ता रोको आंदोलनामुळे जवळपास एक तास पूर्ण वाहतूक खंडित झालेली होती. या रस्ता रोको नंतर सविस्तर मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.रस्ता रोको मधील प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत.1) आरसोली येथील आठ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास कडक शिक्षा झाली पाहिजे.2) खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा.3) पीडित मुलीची संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घ्यावी.4) पीडित कुटुंबाला पंचवीस लाख रुपयांची मदत शासनाने तात्काळ करावी.5) यवतमाळ तालुक्यातील मातंग समाजाच्या मुलीवर केज तालुक्यात आणून बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी. हा रस्ता रोको ऑल इंडिया पॅंथर सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष चंद्रमणी गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आला होता.यावेळी मुस्लिम एकता संस्थापक अध्यक्ष आसिफ भाई जमादार, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे तालुका अध्यक्ष महेंद्र गायकवाड, लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम मराठवाडा जिल्हाध्यक्ष अश्विनीताई साठे, भाजप नेते प्रदीप साठे, एम आय एम चे अध्यक्ष एजाज काजी पाथरूडचे शाखा अध्यक्ष प्रदीप साठे, विकी जावळे, कदु जानराव, पंकज चौधरी, साईराम गायकवाड, नितीन साठे, दीपक गायकवाड, गौस शेख, सलीम बागवान, दीपक पालके, पप्पू शिंदे, पप्पू भालेराव, राहुल इजगज, पंचशील गायकवाड अशोक वाळके, निलेश शीलवंत, दीपक पवार, रुपेश शिंदे लहू नागटिळक तसेच मोठया संख्येने भीमसैनिक उपस्थित होते.