दैनिक चालु वार्ता उप संपादक धाराशिव-नवनाथ यादव
भुम:- महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत हे तीन दिवसाच्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असुन ३ जुन,४ व ५ जुन रोजी जिल्ह्यातील तालुका स्तरीय शासन आपल्या दारी, जिल्हा नियोजन समितीची बैठकीसह तुळजापूर विकास प्राधिकरण आराखडा सादरीकरण घेऊन विविध योजनाचा आढावा घेतील.पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे ३ जुन रोजी भैरवनाथ साखर कारखाना येथे मुक्कामी असतील.४ जुन रोजी सकाळी १०वाजता परंडा येथे तालुकास्तरीय शासन आपल्या दारी येथे नागरिकांशी चर्चा व समस्या निराकरण करतील त्यानंतर दुपारी १ वाजता वाजता भुम येथे उदयोजकता विकास व प्रशिक्षण समारंभ १.३० वाजता तालुकास्तरीय शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपस्थित राहतील. दुपारी ४.१५ वाजता वाशी येथे तालुकास्तरीय शासन आपल्या दारी कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता वाशी येथील भैरवनाथ साखर कारखाना येथे आगमन व राखीव मुक्काम करतील.सोमवारी ५ जुन रोजी सकाळी ९:४५ वाजता धाराशिव शहरातील तुळजाभवानी स्टेडियम येथे जिल्हास्तरीय शासन आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थित राहतील. सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समितीची पालकमंत्री डॉ सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बैठक होईल. त्यानंतर दुपारी १ वाजता तुळजापूर विकास प्राधिकरण आराखडा सादरीकरण घेऊन दुपारी २.३० वाजता तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन कात्रज पुणे येथे प्रयाण करतील.