दैनिक चालु वार्ता खंडाळी सर्कल-संतोष भसमपुरे
==========================
लातूर/अहमदपूर:- आपल्या लेखणीतून समाजातील ,वंचित पीडित आणि अन्यायात होरपळणाऱ्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी परखड शब्दातून बाजू मांडून प्रशासनाला धारेवर धरण्याचे काम अविरत पने करणारे , समाजातील पिडीत घटकांना न्याय मिळवून देणारे पत्रकार म्हणून जिल्ह्यात ख्याती मिळवणारे श्री रमेश पंडित राठोड यांची दैनिक चालू वार्ता च्या लातूर जिल्हा प्रतिनिधी पदी नियुक्ती झाली .त्यांच्या कार्याची दखल घेऊन संपादक श्री लोखंडे सर यांनी त्याच्यावर एक नवीन जबाबदारी सोपवली आहे.
लातूर जिल्हा प्रतिनिधी पदी नियुक्ती झाल्याचे समजताच दैनिक चालू वार्ता अहमदपूर परिवाराने त्यांचा सत्कार आणि गौरव करण्याच्या उद्देशाने अहमदपूर येथे त्यांना निमंत्रित करून त्यांचा सत्कार आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला
सर्कल प्रतिनिधी पासून सुरुवात करून जिल्हा प्रतिनिधी पर्यंत मजल मारताना त्यांनी केलेली मेहनत आणि समर्पण याचे फलित त्यांना मिळाल्याची भावना दैनिक चालू वार्ता अहमदपूर परिवाराने व्यक्त केल्या ,त्यात श्री विष्णू पोले ,संतोष रेड्डी,हणमंत सोमवारे, जयप्रकाश केंद्रे यांनी आपापल्या ओघावत्या वाणीतून राठोड यांच्या कार्याचा आढावा मांडला ,विशेष उपस्थिती म्हणून लाभलेले दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी श्री जमदाडे सर यांनी श्री रमेश पंडित राठोड यांना शुभेच्छा देताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला .
सदर सत्कार समारंभास डॉ जयप्रकाश केंद्रे,श्री कुंडगीर,श्री सोमवारे तसेच दैनिक चालू वार्ता चे प्रतिनिधी श्री संतोष ज्ञानोबा भसमपुरे आणि विष्णू पोले उपस्थित होते.