दैनिक चालू वार्ता निलंगा तालुका प्रतिनिधी -इस्माईल महेबूब शेख
====================
लातूर/निलंगा:कोळी महासंघाचा संवाद दौरा कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वात, भालचंद्र ब्लड बँक येथील फंक्शन हॉल, बस स्टॅन्ड शेजारी लातूर ,येथे दिनांक ४ जून वार रविवार रोजी, ठीक सकाळी ११ वाजता लातूर व उस्मानाबाद येथील कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे व पदाधिकारी निवडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील संपूर्ण पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून ,आपले प्रश्न आमदार रमेश दादा पाटील* यांच्या समोर मांडावेत व आपल्या मनात दडलेल्या भावना मनमोकळेपणाने आमदार साहेबांच्या समोर व्यक्त कराव्यात . आपल्या भावना मनात ठेवून पाठीमागे अप शब्द बोलण्यात काहीही अर्थ नाही.प्रश्न हा माझा आहे तुमचा आहे व सर्व महादेव कोळी समाजाचा आहे. त्यामुळे तर आम्ही आमदार साहेबांना आपल्यासमोर घेऊन येत आहोत. आपल्या भावना दादा समोर संवादातून व्यक्त कराव्यात. प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल व काय केलं पाहिजे हे सुचवावं .असे आव्हान कोळी महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे. समाज बांधवानी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे असे आव्हान आयोजक शिवशंकर फुले यानी केले आहे.