दैनिक चालु वार्ता अहमदपुर प्रतिनिधी -विष्णु मोहन पोले
===============
महिला. मुले भुमीहिन शेतमजुर व मानवी मुल्यावर काम करून सर्व सामान्यांना मुख्य प्रव्हात आणण्यासाठी काम करणारे बालाजी शिंदे,यांचा तेलगांव बीड येथे एकनाथराव ( जिजा ) आवाड यांच्या ९व्या स्मृती दिना निमित्त
लोकशाही मराठी न्युज चे संपादक कमलेश सुतार यांच्या हस्ते” मानवी हक्क कार्यकर्ता सन्मान पुरस्कार ” देवुन सन्मानित करण्यात आले.
मराठवाडयातील लातुर,बीड,नांदेड जिल्ह्यात कर्मवीर एकनाथराव ( जिजा ) आवाड यांच्या काळापासुन आजपर्यंत मानवी मुल्यावर पोट तिडकीने अविरत काम करणारे वंचित हक्क अंदोलन महाराष्ट्र चे प्रदेश अध्यक्ष बालाजी शिंदे,यांच्या कार्याचा गौरव म्हणून कर्मवीर एकनाथराव ( जिजा ) आवाड यांच्या ९व्या स्मृती दिना निमित्त
लोकशाही मराठी न्युज चे संपादक कमलेश सुतार यांच्या हस्ते ” मानवी हक्क कार्यकर्ता सन्मान पुरस्कार ” देवुन सन्मानित करण्यात आले.पार पडलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले व दिवगंत एकनाथ आव्हाड यांचे पुत्र प्रा.डॉ.मिलींद आव्हाड होते.प्रमुख पाहुणे म्हणुन लोकशाही मराठी न्युज चे संपादक कमलेश सुतार तर कार्यकमाचे उदघाटक म्हणुन माजी सीआयडी प्रमुख अशोक धिवरे होते
यावेळी मराठवाड्यासह महाराष्ट्रातील विविध सामाजिक पक्ष संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.या निवडीबद्दल विष्णु आचार्य,सुनिल क्षिरसागर,डॉ.तातेराव वाघमारे,माधव सिरसाट,राहूल गंडले,किशोर कसबे,अविनाश शिंदे,मंगल श्रीमंगले,मधुकर शाहीर ,चंद्रकांत कांबळे,राजेश्वर जोगदंडे,अंकूश चिकटे,डिगांबर चव्हाण,यांच्यासह सामाजिक राजकिय क्षेत्रातुन अभिनंदन केले जात आहे.