दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी : समाधान कळम.
वडोद तांगडा : भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथे ग्रामसंसद कार्यालयात दि: 31 मे रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून,अभिवादन करून जयंती निमित्त ग्रामसंसद कार्यालयाच्या वतीने कर्तबगार महिलांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने ठरल्याप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त वडोद तांगडा ग्रामपंचायतच्या वतीने दोन कर्तबगार महिलांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. ग्रामपंचायत सरपंच सौ. मनिषाताई वर्धामन वास्कर, उपसरपंच नाना पाटील तांगडे, ग्रामविकास अधिकारी मा.श्री बालाजी सरोदे. यांच्य हास्ते आंगनवाड़ी सेविका सुनिता विजय ढोले,आशा सेविका कमल विश्वासराव चव्हाण.या दोन महिलांचा स्मृतीचिन्ह व 500₹ रोख सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला ,यावेळी वर्धामन वास्कर, क्रिष्णा बोदवडकर ग्रा.पं लिपीक. राजू तांगडे ऑपरेटर, आदींची उपस्थिती होती.