दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे:इंदापूर तालुका काँग्रेस भवन चा वाद हा संपूर्ण महाराष्ट्रात फारच गाजत आहे. याचसंदर्भात जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने वकिलामार्फत ऑब्जेक्शन घेतलेल आहे. सदर प्रकरणी धर्मदाय आयुक्तांनी फक्त नाव बदलाचा आदेश दिलेला आहे. कॉंग्रेस भवनची मालमत्ता हि कॉंग्रेस कमिटीच्या नावावर होती . २०१५ ला इंदापूर तालुका कॉंग्रेस ट्रस्ट स्थापन झाला. ही मालमत्ता काँग्रेस पक्षाची आहे. आम्ही सदर विषयात जिल्हा भुमी अभिलेख कडे अपील दाखल केले होते. यासंदर्भात निकाल झाला होता की हे चुकिच आहे . नोंदच चुकिची करुन घेतलेली आहे. १९७२ ला हि प्रॉपर्टी सरकारने कॉंग्रेस कमिटीला दिली. ती प्रॉपर्टी २०१५ ला इंदापूर तालुका कॉंग्रेस ट्रस्टच्या नावावर केली . आता चॅरिटी कमीशनरने इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्ट या नावाच्या बदलाची नोंद केली आहे. या बेसवर ट्रस्टने प्रॉपर्टी ट्रान्सपरचे पत्र दिले आहे. हे पुर्णपणे चुकीचे असुन हा ४२० चा फ्रॉड आहे.एकतर ट्रस्ट नोंद करताना नावात कॉंग्रेस शब्द वापरणे हिच खरी चॅरिटी कमिशनरची चुक आहे.आम्ही याच्या विरोधात तक्रार केलेली आहे. पण आम्ही आता क्रिमीनल ४२० ची केस दाखल करणार आहोत. आम्ही वकिलामार्फत माहिती घेत आहोत , यात सर्व ट्रस्टींच्या विरोधात केस दाखल करणार आहोत. तसेच तलाठी सर्कल यांच्याही विरोधात केस दाखल करणार आहोत.
यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस चे नेते तानाजी भोंग यांनी बोलताना सांगितले की,काॅंग्रेस भवन कोणाचे आहे हे संपूर्ण तालुक्याला माहिती आहे . अहो मेघश्याम पाटील शंकररावजी पाटील (भाऊ) हे त्यावेळी कॉंग्रेस पक्षाचे नेते असल्याने ही इमारत कालांतराने काँग्रेस भवन या नावाने ओळखली जाऊ लागली असं तुम्ही म्हणताय पण त्यावर नावही टाकलेल होतं मोठ्या अक्षरात कॉंग्रेस भवन म्हणून आणि कॉंग्रेस भवन हे कॉंग्रेसचेच असणार भाजप राष्ट्रवादी शिवसेनेच थोडीच असणार आहे. तुम्हाला २०१५ ला स्थापन केलेल्या ट्रस्टमध्ये कॉंग्रेस शब्द का वापरवा लागला ? सदर जागा चोरण्यासाठी का ? असा प्रश्न उपस्थित करून जोरदार टीका केली आहे.