दैनिक चालु वार्ता उपसंपादक अमरावती-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : स्थानिक श्रीमती कृष्णाबाई सारडा इंग्लिश हायस्कूल,अंजनगाव सुर्जी,जिल्हा अमरावती चा शैक्षणिक सत्र २०२२-२३ चा इयत्ता १० वी चा निकाल १००% लागला असुन यशाची उज्वल परंपरा कायम राहिली.परिक्षेला एकुण ४७ विद्यार्थी प्रविष्ठ होते.त्यापैकी ३७ विद्यार्थी प्राविण्य श्रेणी मध्ये पास झालेले आहेत.तसेच कु.तन्मई हरिष पाचकवडे ९६.६०% गुण घेवुन शाळेमधून प्रथम आली आहे व ९०% च्या वर ०९ विद्यार्थी ८०% च्या वर २२ विद्यार्थी गुण मिळवून यशस्वी झाले आहेत.कु. तन्मई हरिष पाचकवडे ९६.६०%,सर्वज्ञ महेंद्र हाडोळे ९६.२०%,प्रितेश संतोष जयस्वाल ९५.००%,कु.सोनाली रमेशराव ताळे ९५.००%,कुणाल दिपक राउत ९४.००%,आदित्य दिनेश चव्हाण ९२.६०%,कु.ईशिका अजय गौर ९२.००%, कु.निकिता राजाराम मेसरे ९२.००%,हुसैन वेग हशिव वेग मिर्झा ९१.८०%,कु.आनंदी सुभाषराव गोरडे ८९.८०%,शुभम किशोर वडतकर ८९.६०%,कु.ईश्वरी प्रमोद बोडखे ८९.४०%, कु.आचल अनिल नवले ८९.४०%, कु.देविका जीवन लांडे ८९.४०%,कु.अंजली अनंत ठाकरे ८९.४०%,वेद सोमेश गांधी ८८.००%,भावेश संजय शेगोकार ८७.६०%,कु.वैभवी नंदकिशोर चिंचोळकर ८६.२०%,कु.नासा चक्रधर हाडोळे ८५.००%,कु.मधुरा महेंद्र नायडकर ८५.००% घेउन उत्तीर्ण झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था सचिव डॉ.श्री.अमर सारडा सर,संस्थेच्या सीईओ.डॉ.सौ.माधुरी सारडा मॅडम,हायस्कूल मुख्याध्यापक श्री.हरीश पाचकवडे सर,प्री-प्रायमरी मुख्याध्यापिका सौ.कुंदा नायडकर मॅडम व वर्गशिक्षक वरूण वर्मा,आशिष शिंदीजामेकर,मनोज मुस्कर,दिपक फुसे,सिमा फरकुंडे,माधुरी गोमाशे व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.