दैनिक चालु वार्ता विशेष प्रतिनिधी तुळजापुर उमरगा-शिवराज पाटील
धाराशिव/उमरगा/लोहरा:-मौजे धानुरी येथे नगरीचे सुपुत्र कोंडीबा दत्तात्रय बुरटूकणे यांचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी कोडीबा दत्तात्रय बुरटूकणे यांच्या घरापासून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.तसेच गावातील महिलांनी जागोजागी आरती करून स्वागत करण्यात आले.त्या नंतर सत्कार चा कार्यक्रम हा सांस्कृतिक सभागृह धानुरी येथे ठेवण्यात आला या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष धनराज जाधव प्रमुख पाहुणे अभिजित कापरसे,गावातील सर्व आजी माजी सैनिक उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद शाळा येथील शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला होता .यावेळी मनोगत व्यक्त करताना लोहारा तालुक्याचे तहसीलदार रुईकर साहेब ,महादेव जाधव,सतीश यादव यांनी आपल्या जुन्या आठवणी व अनुभव सांगण्यात आला या वेळी मा दिपक जवळगे यांनी मार्गदर्शन करताना गावातील सर्व माजी सैनिक यांना विनंती केली की गावात सैनिक पूर्व प्रशिक्षण केंद्र चालू करून गावातील युवकांना मार्गदर्शन करण्यात यावे अशी विनंती केली या वेळी उपस्थित सर्व मित्र वर्ग अनिल साळुंके,कोडीबा सरडे ,अंकुश साळुंके, भरत जाधव,अतुल बुरठूकने, अमोल लोहटकर,राजकुमार सूर्यवंशी,विठ्ठल बुरठूकने, नेताजी लूटे, विजय साळुंके, मारुती लोहटकर,परमेश्वर साळुंके, महादेव बुरठूकने, उमेश बुरठूकने,नागेश यादव,सुदाम यादव, या वेळी आपल्या शैलीत प्रमोद लाड यांनी सूत्रसंचालन करून उपस्थित लोकांना देशभक्ती बाबत जागरूक केले.