दैनिक चालु वार्ता विशेष प्रतिनिधी तुळजापूर उमरगा-शिवराज पाटील
धाराशिव/तुळजापूर :-बोरगाव तुपाचे येथील किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदी गौरीशंकर मुळे यांची राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या युवा धोरण व संशोधन विभागाच्या सह समन्वयक पदी निवड करण्यात आली.ग्रामीण भागातील तरुण काँग्रेस कार्यकर्ता प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करीत असल्याची ही पावती त्यांना काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली आहे.त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल काँग्रस पक्षातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.याबद्दल बोरगाव व परिसरातील सर्व जनतेकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे .काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाचा प्रचार प्रसार व युवकांसाठीच धोरण तयार करण्यामध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे.त्यांच्या कुटुंबातील ही चौथी पिढी आहे ही काँग्रेससाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम करणारे आहेत.तुळजापूर तालुकाकाँग्रेसचे माजी अध्यक्ष सिद्रामप्पा मुळे यांचे ते चिरंजीव आहेत. ही संधी मिळाली यातून युवकांना एक प्रेरणा मिळत आहे.निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे या निवडी बद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले,कार्याध्यक्ष माजी आमदार बसवराज पाटील,काँग्रेस प्रदेश सचिव सुनील चव्हाण,युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष शरण पाटील,सरचिटणीस अभिजित चव्हाण,जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील,ॲड. विश्वजीत शिंदे उपाध्यक्ष विधी विभाग यांनी शुभेच्या दिल्या.