दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-अहमदपुर-विष्णु मोहन पोले
===========
लातुर/अहमदपुर / हाडोळती: -मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत हाडोळती तालुका अहमदपूर येथील दयानंद विद्यालयाचा निकाल 97.19 टक्के लागला असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे. केंद्रातून व शाळेतून प्रथम,द्वितीय व तृतीय गुणवंत विद्यर्थी
गादेवार उपेंद्र उल्हास 95.60%,प्रथम
पवार सुप्रिया मुक्तीराम 94.80% द्वितीय ,
शेख हुजेब सुकूर 94.20% तृतीय ,
मुळके रोहिणी ज्ञानेश्वर 91.10%,
माने प्रसेनजीत प्रताप 90.80% गुण घेऊन यश संपादन केलेली आहे. तसेच मागासवर्गीयातून शाळेतून
माने प्रसेनजीत प्रताप 90.80% प्रथम,
कांबळे पूनम अंबादास 87.80% द्वितीय ,
तर कलवले सीमा शिवराज 82.60% तृतीय आली आहे. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांमध्ये
शेख हुजेब शुकुर 94.20% प्रथम,
काजी जवेरीया जकियोदिन 83.60% द्वितीय,तर
मनियार मोहसीन महेबुबसाब79.40 % तृतीया आला आहे. विशेष प्राविण्यासह 41 विद्यार्थी ,प्रथम श्रेणी मध्ये 43 विद्यार्थी ,तर द्वितीय श्रेणीमध्ये 20 विद्यार्थींनी गुण घेवून यश संपादन केले आहे. हडोळती केंद्रातून प्रथम,द्वितीय व तृतीय येण्याचा मान दयानंद विद्यालयाने मिळविला आहे.या यशस्वी विद्यार्थ्यांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. पी.टी. पवार सर, सचिव डॉ. निलेश भैय्या पवार, प्राचार्य जोगदंड आय.एम., पर्यवेक्षक अशोक कोटसूळवार,श्री बिलापटे एन.एस. श्री कदम एस. आय.,श्री कोडगावे जी.व्ही. ,श्री यादव एस. जी., श्री उपाध्ये पी.आर., श्री येरमे एल .व्ही .,श्री यंचलवाड पी.टी., श्री येचाळे डी.डी., श्रीमती पवार एस.एम., श्रीमती निराळवाड एस.एस., श्री कलमे एन.एस.,आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व गावकरी यांनी अभिनंदन केले आहे.