दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी- बालाजी देशमुख
बीड/अंबाजोगाई–श्रीराम माध्यमिक विद्यालयाचा नुकताच एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल लागला असून या शाळेचा 100% निकाल लागला असून विशेष प्राविण्यात 11, प्रथम श्रेणीत 21, द्वितीय श्रेणीत 4 विद्यार्थी आले आहेत.
या विद्यालयातून प्रथम येण्याचा मान कु. साधना श्रीहरी शेंडगे(87.40%), द्वितीय- कु. वेदश्री गोविंद शिंदे(82.80%), तृतीय-कु. धुमाळ अनुजा महादेव(80.80%) येण्याचा बहुमान या विद्यार्थ्यांनी मिळवला आहे.
या शाळेने निकालाची उज्वल परंपरा कायम राखली असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव आदरणीय श्री. दशरथ शिंदे( दादा), मुख्याध्यापिका श्रीमती ढाणे नील प्रभा लिंबाजी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच पालक व गावकरी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.