दैनिक चालु वार्ता उमापूर प्रतिनिधी-कृष्णा जाधव
गेवराई/उमापूर उमापूर व उमापूर परिसरातील संपूर्ण गावागावात गुटखा चे प्रमाण खूप वाढले असून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज युवा पिढीत गुटक्याचे प्रमाण खूप वाढले असून त्यात धूम्रपान मद्यपान ही खूप जोमाने चालू आहे.
एक दोन वर्षाच्या काळामध्ये गुटखा बंदी असूनही अल्पवयीन मुलांमध्ये गुटक्याचे प्रमाण खूप वाढलेले दिसून येते.गावात व गावातल्या परिसरात सर्रासपणे गुटखा विक्री सुरू आहे.
येथे लहानापासून तर मोठ्यापर्यंत गुटक्याचे सेवन करतात.यात युवा पिढी अधिक प्रमाणात आहे.
गुटखा बंद होऊनही प्रत्येक गावागावात ब्लॅक मध्ये हा गुटखा विकला जातो.
पोलीस प्रशासनाने याकडे आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे.ही आज काळाची गरज आहे.पालकांना चोरून ही युवा पिढी गुटखा खातात.
लहान मुलांमध्ये हे प्रमाण जास्त दिसून येते.प्रशासनाने याची प्रमाणिकपणाने दखल घेऊन यावर कार्यवाही करावी.गुटख्यामुळे जनतेतून हळहळ व्यक्त केली जाते.
कोठेही गुटखा मिळत असल्याने सर्रासपणे गुटक्याची विक्री सुरू आहे.हे लोकांतून सांगण्यात येत आहे.या गुटक्यांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने योग्य पाऊल उचलावे.अशी जनतेतून मागणी होत आहे.