दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
.
देगलूर प्र.
श्री धोंडोपंत दादा साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज पायी दिंडी सोहळा सावळी ते पंढरपूर.ह भ प चंदर महाराज सावळीकर यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 10. 6.2023 रोजी वळग येथे गंगाधर झरे यांच्या घरी मुक्कामी होती.दिनांक 11. 6. 2023 रोजी वळग येथून प्रस्थान करताना भगीरथनामा वृत्तपत्राचे मराठवाडा उपसंपादक व श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह चे संपादक चंद्रकांत गज्जलवार वळगकर यांच्या हस्ते ह भ प चंदर महाराज सावळीकर यांचा भगीरथ नामा वृत्तपत्र संत वचन अंक व भगवी दस्ती पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वारकरी समुदाय तसेच युवा कीर्तनकार ह भ प निळोबा महाराज विभुते, ह भ प प्रल्हाद महाराज, ह भ प माऊली महाराज विभुते, श्री ह भ प तुकाराम महाराज विभुते बाल कीर्तनकार नितीन महाराज बामणी, ह भ प आत्माराम पाटील वसुरे, ह भ प ज्ञानेश्वर येळगे आंदेगाव,संजय सोरटे आंदेगाव, ज्ञानगंगा वारकरी शिक्षण संस्था आळंदी या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
गावातील ह भ प दत्तात्रय मोरे महाराज, गंगाधरराव झरे, बळी पाटील भाटापुरकर, ह भ प निवृत्ती महाराज, गावातील बरेच टाळकरी. महिला वर्ग उपस्थित होता.