दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा येणाऱ्या भविष्यकाळात मंठा बाजार समिती एक आदर्श बाजार समिती म्हणून असेल शेतकऱ्यांच्या अपेक्षापूर्ती करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व घटकांना सोबत घेऊन प्रसंगी कठोर निर्णय घेण्याची गरज भासली तरी असे निर्णय घेऊन भविष्यात मंठा बाजार समिती एक आदर्श बाजार पेठ म्हणून नावारुपाला आलेली असेल असा विश्वास बाजार समितीचे सभापती ए.जे.
बोराडे यांनी व्यक्त केला ते अडत असोसिएशनच्या वतीने आयोजित सत्काराला उत्तर देताना बोलत होते.यावेळी उपसभापती गोपाळराव बोराडे,अँड पंकजराव बोराडे, शिवसेना ज्येष्ठनेते अंकुशराव अवचार, संचालक कल्याणराव खरात,संतोष वरकड,ता.प्रमुख अजय अवचार,तुळशीराम कुहिरे,पप्पू दायमा,सचिव रमेश बोराडे, यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीस अडत असोसिएशनच्या वतीने नवनिर्वाचित सभापती,उपसभापती, संचालक मंडळ व नवनियुक्त सचिव यांचा शाल, हार,व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोराडे पुढे बोलताना म्हणाले की,अडत असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कारामुळे बाजार समितीच्या संचालक मंडळाची जबाबदारी वाढली आहे. व्यापारी वर्गाच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या व सूचना पाहता मागील दहा वर्षाच्या काळात विकासाच्या दृष्टीने कुठली कामे झाली की नाही हा प्रश्न उपस्थित होतो.
मार्केट यार्ड वाटप झालेले भूखंड ज्या उद्देशासाठी दिले होते तो उद्देश पूर्ण होत नसेल तर असे भूखंड वेळप्रसंगी बाजार समिती परत घेईल त्यामुळे व्यापारी वर्गाने घेतलेला भूखंड उद्दिष्ट्यपूर्तीसाठी वापरावा तसेच मार्केट यार्ड भुसार खरेदीदार,मुख्य रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थित करणे, बाजार समितीकडे असलेला प्लेट काटा सुरू करणे, स्वच्छतागृहाची उभारणी करणे, बाजार समितीकडे असलेले चाळणी यंत्र अद्यावत करून सुरू करणे,शेतकऱ्यांसाठी अतिथीग्रह व विश्रामगृहाची व्यवस्था करणे,मध्यान भोजन व्यवस्था,बीट बोली साठी शेड हॉलची निर्मिती करणे, शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या शेतीमालाच्या गाड्यांना उभी करण्यासाठी पार्किंग व्यवस्था अशा व्यापाऱ्यांच्या आलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हे संचालक मंडळ सातत्याने प्रयत्नशील राहील.मात्र यासाठी व्यापाऱ्यांनी देखील बाजार समितीची फीस वेळोवेळी भरून सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे बोलून दाखवले.
यावेळी अँड पंकज बोराडे, उपसभापती गोपाळराव बोराडे यांनी देखील उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले.या वेळी अडत असोसिएशनचे अध्यक्ष रंजीत दांगट,उपाध्यक्ष गणेश सराफ, कोषाध्यक्ष लक्ष्मण बोराडे,सचिव महेश गोरे, भानुदासराव बोराडे, पुंजाराम शिंदे,मुसाभाई कुरेशी,संतोष डांगे, विलास उन्हाळे,प्रकाश हातकडके,सचिन साबू,सतीश गोरे,अंकुशराव वायाळ, प्रकाशराव चिंचने,मातीन बागवान,शेख इद्रिसभाई,गणेश उन्हाळे,रवी महाजन,केशव गिरी,यांच्यासह अनेक व्यापाऱ्यांची उपस्थिती होती.या वेळी उपस्थितांचे आभार रंजीत दांगट यांनी मांनले….