दैनिक चालु वार्ता उप संपादक धाराशिव-नवनाथ यादव
भू म:-राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव चे पालकमंत्री प्रा. डॉ.तानाजीराव सावंत यांच्या २७ मार्च रोजी जनता दरबारात अनेक कार्यालया संदर्भात तक्रारी आल्या होत्या.त्याच अनुषंगाने ना.प्रा. डॉ तानाजीराव सावंत युवा मंच च्या वतीने शासकीय कार्यालय कामा संदर्भात अडचणी आल्यास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले होते. नागरिकांनी जनता दरबारात मांडलेल्या तक्रारींचा ना.प्रा. डॉ.तानाजीराव सावंत युवा मंच कडून पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्यात येत आहे.शेंडगे गल्ली मधील रणजीत भोळे यांनी सौर ऊर्जा योजनेसाठी १६५५० रू भरले असून अद्याप यावर कोणतीही कार्यवाही झालेली दिसून आली नाही .ना .प्रा. डॉ तानाजीराव सावंत युवा मंच चे अध्यक्ष प्रभाकर शेंडगे यांनी संबधित अधिकाऱ्यांना भेटून पाठपुरावा करून योजना देण्यास समर्थता दर्शवली. विज बिल, जात प्रमाणपत्र, शासकीय योजने संबंधित नागरिकांना अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असल्यामुळे नागरीक राज्याचे आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या ना.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत युवा मंच च्या कार्यपद्धतीवर खुश असून काम झाल्याचे समाधान नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.