दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:दिनांक 12/06/2023 : — श्रेया आय. ए. एस. ही स्पर्धा परिक्षा गेल्या सोळा वर्षा पासुन प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यास नवीन आद्यवत शिक्षण अवगत व्हावे , नवीन क्षमता वाढवणे , आत्मविश्वास वाढवने , परीक्षेची भीती नष्ट करने , शैक्षणिक आव्हानाला सामोरे जाने , नवीन शैक्षणिक समस्या सोडऊन अभ्यासाचा अचुक मार्ग शोधण्यासाठी स्पर्धा परिक्षा हा पर्याय आहे .त्यातील श्रेया ( I A S ) ही राज्य स्तरीय स्पर्धा परिक्षा मार्च 2023 मधे घेण्यात आली . या परीक्षेत युनिक अकॅडमी चा सरस्वती विद्यालय इंग्लीश मेडियम मधे पहिल्या वर्गात शिकणारा विद्यार्थी अनंता सुनील जाधव हा वैशाली व डॉ. सुनील जाधव यांचा मुलगा राज्यातुन सातवा आला आहे . त्याच्या या नेत्र दिपक यशा मुळे देगलुर च्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा रोवन्यात आला आहे .या यश संपादना मुळे अनंता जाधव , आई वैशाली , वडील डॉ. सुनील जाधव , युनिक अकॅड्मी चे गुरु इंगोले सर , सरस्वती विद्यालय चे मुख्याध्यापक भारती ताई व उदय सर यांचे सर्व स्तरातील प्रेमी आप्त जना कडुन अभिनंदन होत आहे .