दैनिक चालु वार्ता उप संपादक धाराशिव-नवनाथ यादव
भूम:-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत,या निमित्ताने भूम तालुक्यातून अधिकाधिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य युवराज नळे यांनी केले.
सोमवार दि.12 जून रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रवेश सदस्य युवराज नळे यांनी भूम तालुक्यातील भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्त्यांचा, शक्ति केंद्रप्रमुख व बुथ अध्यक्ष याच्या कार्याचा आढावा घेतला.याशिवाय 15 जून 2023 रोजी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, यानिमित्ताने भूम तालुक्यातून जास्तीत जास्त पदाधिकारी कार्यकर्त्यांनी , शक्ती केंद्र व बुथ प्रमुखांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील भाजप समर्थकांना घेऊन धाराशिव येथील आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहनही यावेळेस युवराज नळे यांनी केले आहे.भारतीय जनता पार्टीचे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्याला ९ वर्षे पूर्ण झाली.या दरम्यानच्या काळात ज्या लोककल्याणकारी योजना,जनहितार्थ योजना राबवलेल्या आहेत.त्या योजनांची माहिती घरोघरी पोहोचली पाहिजे.या संदर्भाने संपूर्ण जून महिनाभर विशेष मोहिम भारतीय जनता पार्टीच्यावतीने जनसंपर्क अभियान राबवल आहे.
या दरम्यान माजी आ.सुजितसिंह ठाकुर, माजी मंत्री आ.राणा जगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्तनी भूम तालुक्यात प्रत्येक बूथ निहाय आढावा घेऊन कार्याची व्याप्ती केलेल्या कामाची माहिती घेऊन या पुढील काळात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील खासदार भारतीय जनता पार्टीचा होणारच आहे .या यशामध्ये प्रत्येकाचा खारीचा वाटा असावा यासाठी प्रत्येकाने अंग मेहनतीने काम करावे,प्रत्येक बूथ सक्षम करावे, प्रत्येकाला दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी असेही आवाहन केले.
या बैठकीसाठी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते जालिंदर मोहिते,बाळासाहेब क्षीरसागर ,जिल्हा सरचिटणीस आदम शेख, तालुका अध्यक्ष महादेव वडेकर , तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर, उपाध्यक्ष बाबासाहेब वीर,भूम शहराध्यक्ष शंकर खामकर, सरचिटणीस हेमत देशमुख,बाजार समितीचे नूतन संचालक अंगद मुरूमकर,अमोल बोराडे, विकास जालन महाराज,मीडिया विभाग तालुका अध्यक्ष सुहास बुरटे, सुजित वेदपाठक महिला मोर्चा तालुका अध्यक्ष लताताई गोरे यांच्यासह तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सरपंच, उपसरपंच , सदस्य, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, संचालक, शक्ती केंद्र प्रमुख,बूथ प्रमुख,मिडिया प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .