दैनिक चालु वार्ता उप संपादक धाराशिव-नवनाथ यादव
भू म:-पार्डी फाटा ते नगर जिल्हा हद्द रोडचे काम निकृष्ट दर्जाचे असून या कामाची चौकशी करावी असे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१२ जून रोजी वंचित बहुजन युवा आघाडी चे पदाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे यांना दिले आहे. सविस्तर निवेदनात असे म्हटले आहे की,गेल्या दीड ते दोन वर्षांपासून पार्डी फाटा ते नगर जिल्हा हद्द या रोडचे काम चालू आहे, संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे असून पुलाचे काम चालू आहे तेथील साईड रस्ते व्यवस्थित बनवलेले नाहीत,तसेच पुढे काम चालू आहे अश्या प्रकारचे माहिती दर्शवणारे फलक कोठेही लावलेले नाहीत,त्यामुळे रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होत आहेत. हे सर्व होत असताना संबंधित अधिकारी याच्याकडे उघडपणे दुर्लक्ष करत आहेत. मागील दिवसापूर्वी बावी येथील पुलावर रस्त्यावरील खड्यात गाडी आपटून एका निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. या सर्व घटनेला जबाबदार संबंधित गुत्तेदार व अधिकारी असून आणखी किती निष्पाप नागरिकांचे बळी घेणार आहेत हे गुतेदार व अधिकारी?तरी संबंधित गुतेदार व अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. व सदर गुतेदार यांचा गुतेदारी परवाना काळ्या यादीत टाकण्यात यावा.अन्यथा २८/०६/२०२३ रोजी आपल्या कार्यालय समोर आमरण उपोषण करण्यात येईल.अशा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.या निवेदनावर जिल्हा महासचिव धीरज शिंदे,युवा जिल्हाउपाध्यक्ष वैभव गायकवाड,शहराध्यक्ष,रोहित गायकवाड, महासचिव अजित शिंदे,शहर सचिव सचिन शिंदे,पदाधिकारी यशपाल शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.