दैनिक चालु वार्ता उप संपादक धाराशिव-नवनाथ यादव
भूम :-तालुक्यातील पाथरूड येथे भूम पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पोलिसांचे गाव भेट अभियान संपन्न झाले.या अभियानामध्ये नागरिकांना सर्व घडणाऱ्या गुन्ह्याबद्दल इत्यंभूत माहिती देण्यात आली यामध्ये प्रामुख्याने फसवणूकीचे,सेक्सटॉर्शन,विविध आमिष देऊन आर्थिक फसवणुक,अवैद्य दारू त्यापासून होणारे कुटुंबीयांनात्रास ,महिलांना होणारा त्रास ,महिलांची सुरक्षा,आधी बद्दल संपूर्ण माहिती पो नी साळवे यांनी गावकऱ्यांना दिली. तसेच पो.नी .साळवे यांचे स्वागत गावचे सरपंच शिवाजीराव तिकटे यांनी केले.पोलीस कॉन्स्टेबल मुंडे यांचे स्वागत सदाशिव गव्हाणे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.चेतन बोराडे यांनी केले, तर आभार हरिदास बोराडे यांनी मांडले.या कार्यक्रमास सर्व गावकऱ्यांची व महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.ग्रामस्थाना अतिशय समजेल अशा सोप्या भाषेत सर्व गुन्ह्यांची माहिती दिली.
समाजिक सलोखा राखण्यासाठी नागरिकांना निर्व्यसनी व अध्यात्माची गरज आहे असेही मत पोलीस निरीक्षक साळवे यांनी व्यक्त केले.