दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
आलापल्ली
आलापल्ली :- आलापल्ली इथे शिक्षण घेत असलेली एटापल्लीतील आदिवासी मुलगी आलापल्ली इथे कागदपत्रे काढण्यासाठी आली असता तेथील दोन अनोळखी इसमाने तिच्यावर अत्याचार केल्याच समोर आलंय
त्या दोन्ही नराधमांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी गोंडवाना गणतंत्र पार्टी चे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष प्रशांत मडावी यांनी केली,
सदर पिडीत मुलगी १० चा निकाल लागताच T C व मार्कलीस्ट काढण्यासाठी आलापल्ली इथे आली असता रोशन गोडसेलवार वय २३ व निहाल कुमारे वय २३ रा, आलापल्ली हे दोघेजण सदर मुलीला भेटून त्यांनी रोशन च्या मित्राच्या खोलीवर नेले तेथे तिला मध पाजून तिच्यावर अत्याचार केला दुसऱ्या दिवशी तिला बसस्थानकावर सोळुन दिले,
ति घाबरलेली पिडीत मुलगी सदर आप बिती आपल्या आई वडिलांना सांगितले असता त्यांनी एटापल्ली पोलिस स्टेशन इथे रिपोट दिली असता सदर रिपोट आलापल्ली पोलिस स्टेशन ला वर्ग करून पुढील तपास आलापल्ली पोलिस अधीक तपास करीत आहे,
अल्पवयीन आदिवासी मुलीवर अत्याचार करणाऱ्या त्या दोन्ही नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी मार्फत पाठवण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देताना गोंडवाना गणतंत्र पार्टी चे नेते रमेश कोरचा, जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी, बादल मडावी, बिरसा ब्रिगेडचे गणेश वरखडे,मालता पुडे आदींची उपस्थिती होती