दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड- गोविंद पवार
लोहा शहरातील दिव्यांगाचे ५ टक्के मानधन लोहा न.पा. ने तात्काळ वाटप करावे अशी मागणी लोहा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांनी लोहा न.पा. च्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे .
पुढे निवेदनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांनी असे नमूद केले की,लोहा नगर परिषदेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे शासनाच्या आदेशाप्रमाणे दिव्यांग असलेल्या लाभार्थ्यांचे लोहा नगर परिषदेच्या वार्षिक उत्पन्नाच्या ५ टक्के मानधन देयाचे असते ते अद्याप पर्यंत लाभार्थ्यांना मिळाले नाही.
तेव्हा लोहा न.पा. ने तात्काळ १० दिवसांच्या आत लोहा शहरातील दिव्यांगाना मानधन वाटप करावे अन्यथा लोहा न.पा. कार्यालयासमोर लोहा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांनी लोहा न.पा. च्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.