दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -कवि सरकार इंगळी
छत्रपती संभाजी नगर येथील प्रा. राहुल मन्नाडे यांची संशोधनरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. त्यांना जिजाऊ भवन बाबा पेट्रोल पंपाजवळ छ्त्रपती संभाजी नगर येथील पुरस्कार सोहळ्यात प्रा. राहुल मन्नाडे यांना संशोधनरत्न पुरस्कार, सन्मानचिन्ह,सन्मानत्र देऊन गौरण्यात गौरविण्यात आले. प्रा. राहुल मन्नाडे, हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद, छत्रपती संभाजी नगर येथे माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये कार्यरत असून सध्या त्यांचे संगणक अभियांत्रिकी या विषयामध्ये संशोधन सुरू आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन ‘काळीज माझ साहित्य’, या सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक श्रीमती.संगीताताई जामगे, संमेलन अध्यक्ष. मा. चंद्रकांत दादा वानखेडे, स्वागत अध्यक्ष. मा.संदीपान पाटील भुमरे, प्रमुख पाहुणे मा. लताताई पगारे , मा. गुलाब राजा फुलमाळी, मा. रज्जाक भाई शेख, मा. डॉ. लक्ष्मण हेंबाडे मा. डॉ. सुशील सातपुते, आयोजिका मा.सुरेखा बेंद्रे, ( संचालिका ) , मा.अर्चना राहुकार (उपाध्यक्ष ), मा. शुभम बेंद्रे ( सचिव ) , मा. विजय पाटील ( सहसचिव ) आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. राहुल मन्नाडे यांना संशोधनरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विद्यार्थी, पालक, गुरुवर्य, मित्रपरिवार, नातेवाईक, सहकारी प्राध्यापक वर्ग, सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन रानकवी जगदिप वनशिव यांनी केले.