दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मेहकर-सागर पाटील गव्हाड
घाटबोरी येथील वनरक्षक निलंबित तर वनपाल
मालकी हक्कातील एकशे तीस झाडांची परवानगी अन् ठेकेदाराने तोडली पाचशेच्या वर झाडे , मालकी हक्कातील झाडे तोडून जंगलात ठेवल्याने कर्मचाऱ्यांसह शेतमालक अडचणीत.
मेहकर बहुचर्चित ठरणाऱ्या घाटबोरी येथील वनपरिक्षेत्राच्या हद्दीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात सागवानाची अवैधपणे कत्तल झाल्याच्या तक्रारी वनविभागात प्राप्त झाल्या होत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घाटबोरी येथे भेटीदरम्यान वनरक्षक कीर्ती खरात यांना निलंबनाची कार्यवाही करून एकच वन विभागात खळबळ उडाली. आज अमरावती येथील वनविभागाची वरिष्ठ अधिकाऱ्यां सह घाटबोरी वर्तुळात भेट देत कर्मचाऱ्यांसह अधिकार्यांची चांगलीच तारांबळ उडालेचे चित्र दिसले.
आज सकाळी दहा वाजेपासून सुरू झालेल्या पाहणी दरम्यान मालकी हक्कातील 160 झाडांची परवानगी वन विभागाने दिली होती. परंतु ठेकेदाराने तब्बल 450 च्यावर सागवान झाडे तोडली आहेत.व मालकी हक्कातील झाडे तोडून घाटबोरी भाग एक मधील घाटबोरी भाग 2 मध्ये जंगलात टाकल्याने एकच गोंधळ उडाला. तोडलेल्या झाडावर कुठेच वन विभागाची शिक्के नाहीत. कारवाई झालेल्या वनरक्षकासह वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर टांगती तलवार असल्याचे बोलल्या जात आहे. या कारवाई तपासासाठी अमरावतीचे विभागीय वनसंरक्षक करे, वनपरिक्षेत्र अधिकारी भुजाडे , गुज्जर सर्वेअर अमरावती सोबत घाट बोरी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी तोंडीलायता, वनपाल उषा जाधव, वनरक्षक लठठाड, वनरक्षक डोईफोडे, वनरक्षक भोंडे हजर होते.