दैनिक चालु वार्ता ग्रामीण प्रतिनिधी- माणिक सुर्यवंशी….
जिल्हा प्रशासनाने दोन महिन्याच्या आत जि.प. खानापूर शाळेस इंग्रजी या महत्वपूर्ण विषयाचे रिक्त पद भरण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. समस्त गावकरी मंडळींनी आज जिल्हा प्रशासनाच्या विनंतीस मान देऊन आंदोलन स्थगित केले असून “येत्या दोन महिन्यात इंग्रजी” विषयाचे रिक्त पद भरले नाही तर लोकशाही मार्गाने याहीपेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाला “समस्त गावकरी मंडळी खानापूर” ने दिला आहे. यापूर्वी गेल्या वर्षी गणित व विज्ञान या महत्वपूर्ण विषयाचे पद वर्षभर रिक्त ठेवून प्रशासनाने विद्यार्थ्याचे अतोनात नुकसान केले आहे. याचाही रोष जनतेनी गटशिक्षणाधिकाऱ्यापुढे मांडला. व यापुढेही सतत जिल्हा परिषद हायस्कूल खानापूर शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी समस्त गावकरी मंडळींनी एकत्रित येऊन कार्य करण्याचे बोलून दाखवले.
यावेळी उपस्थित गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती, सर्वपक्षीय राजकीय नेते, कार्यकर्ते मंडळी, माजी शिक्षक, शेतकरी, शेतमजूर, महिला,पालक वर्ग, तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.