दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर :देगलूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळग येथे दिनांक 15/06/2023 रोजी उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर शैक्षणिक वर्ष 23 /24चा शाळेचा पहिला दिवस असल्याकारणाने सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पहिल्याच दिवशी शालेय पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले शिक्षण विस्तार अधिकारी हमीद दौलता बादी यांचा सत्कार भगीरथ नामाचे मराठवाडा उपसंपादक चंद्रकांत गज्जलवार वळगकर व शाळेचे मुख्याध्यापक मारकवार सर यांनी भगीरथ नामावर्तपत्र व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जाती व्यवस्थेची निर्मूलन ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षक वृंद अग्रेसर, सेवानिवृत्त गज्जलवार सर, भंगे सर, राठोड सर, वट्टमवार सर,देशमुख सर, मुंगळे सर, रमेश महाराज, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.